। खोपोली । वार्ताहर ।
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत केलेल्या बेताल आणि आक्षेपार्ह विधानांच्या निषेधार्थ खोपोलीत फुले, शाहू, आंबेडकर विचार मंच आक्रामक होत घोषणाबाजी केली. मंत्री पाटील यांनी महापुरषांची बदनामी करीत सामाजिक भावना दुखावल्याबद्दल गुन्हा दाखल करा असे निवेदन खोपोली पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरिक्षक हरेश कळसेकर यांच्याकडे देण्यात आले आहे.
यावेळी मोहन औसरमल, नरेंद्र गायकवाड, कैलास गायकवाड,रविंद्र रोकडे तुकारामशेठ साबळे, प्रमोद महाडीक, अतुल पाटील सुवर्णा मोरे, शिल्पा सुर्वे, अंजु सरकार, केविना गायकवाड, यशवंत गायकवाड, संजय रूपवते, राजेश गायकवाड, अरूण गायकवाड, अनिल सानप, गोपिनाथ सोनावणे, भाई ओव्हाळ, राजू गायकवाड, राष्ट्रवादीच्या वैशाली भोसले, अश्विनी ढोळे, शोभा फाळे, रिना जाधव, कामिनी जाधव यांच्यासह फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे कार्यकर्ते उपस्थित होते.