| गोवे-कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील गावदेवी क्रीडा मंडळ नडवली आयोजित क्रिकेट सामन्यात भाई भाई खांब संघ ठरला. अंतिम सामना भाई भाई खांब विरुद्ध शिरवली यांच्यात झालेल्या अंतिम अटीतटीच्या सामन्यात अखेर भाई भाई खांब संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकवला तर शिरवली संघाला दुसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेतील तृतीय क्रमांक मुठवली हा संघ मानकरी ठरला. उत्कृष्ट सामनावीर शिरवली संघाचा शुभम पोटफोडे, स्पर्धेतील उकृष्ट गोलंदाज मुठवली संघाचा स्वप्नील कापसे तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून भाई भाई खांब संघाचा विजय खामकर यांना गौरविण्यात आले .
खांब विभागीय क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने श्री गावदेवी क्रीडा मंडळ खांब यांनी आयोजित केलेल्या स्पर्धा नडवलीच्या प्रांगणात भव्य दिव्य असे क्रिकेट सामन्याचे उदघाटन किशोर जाधव, कांचन केशव मोहिते, नितिन भोसले, कल्पेश गोठम , शशिकांत भिसे, सुरज भिसे, साहिल गोठम, सुमित जाधव, करणं मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले.
खांब क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने श्री गावदेवी क्रीडा मंडळ नडवली यांनी भव्यदिव्य आयोजित केलेल्या सदरच्या मर्यादित शतकाच्या क्रिकेट स्पर्धेला रसिकप्रेशकांचा भरभरून प्रतिसाद लाभला होता. स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी गावदेवी नडवली क्रीडा मंडळाच्या सर्व पदाधिकारी वर्गाने व खांब क्रिकेट







