। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आजपासून नवीन वर्ष 2023 सुरू झाले आहे. नववर्षासोबतच सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी 1 जानेवारी 2023 रोजी गॅस सिलेंडरच्या नवीन किंमती जाहीर केल्या आहेत. विशेष म्हणजे गॅस सिलेंडरच्या दरात 25 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. ही वाढ व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत करण्यात आली असून घरगुती गॅस सिलेंडर जुन्या दरात उपलब्ध आहेत. राजधानी दिल्लीत आज व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे.
अशा स्थितीत व्यावसायिक गॅस सिलेंडर महाग झाल्याने रेस्टॉरंट, हॉटेल मधील खाद्यपदार्थ महाग होऊ शकतात. नवे दरही आजपासून लागू झाले आहेत.
आजचे व्यावसायिकगॅससिलेंडरचे दर
दिल्ली – 1769 रुपये प्रति सिलेंडर
मुंबई – 1721 रुपये प्रति सिलेंडर
कोलकाता – 1870 रुपये प्रति सिलेंडर
चेन्नई – 1917 रुपये प्रति सिलेंडर
आजचे घरगुती गॅस सिलेंडरचे दर
दिल्ली – 1053 रुपये प्रति सिलेंडर
मुंबई – 1052.5 रुपये प्रति सिलेंडर
कोलकाता – 1079 रुपये प्रति सिलेंडर
चेन्नई – 1068.5 रुपये प्रति सिलेंडर