| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्हा पोलिस दलातील सहा पोलिस वाहन चालक पदासाठी मंगळवारपासून भरती प्रक्रिया सुरू झाली. भरतीच्या पहिल्या दिवशी बोलावण्यात आलेल्या 647 उमेदवारांपैकी 377 उमेदवारांनी उपस्थित राहत मैदानी परीक्षा दिली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
पहिल्याच दिवशी उमेदवारांची बायोमेट्रीक पडताळणी घेऊन भरती प्रक्रीयेस सुरुवात झाली. 6 वाहन चालक पदासाठी प्राप्त झालेल्या 647 अर्जापैकी पहिल्या दिवशी 377 उमेदवारांना बोलावण्यात आले होते. मैदानी परीक्षेसाठी उपस्थित राहिलेल्या उमेदवारांनी धावणे, गोळाफेक आदी परीक्षा दिल्या असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. शिस्तबध्द पद्धतीने मैदानी परीक्षा घेण्यात आली असून येथील मुलांना हेल्दी फ्री-फुड ही ठेवण्यात आले होते. भरती प्रक्रियेसाठी सोमवार पासून विविध जिल्ह्यातील मुलं-मुली अलिबाग शहरात आपल्या पालकांसोबत दाखल झाले होते. अथक प्रयत्नानंतर आज या मुलांनी भरती प्रक्रियेत सहभागी होता आले.