| पाली/बेणसे । वार्ताहर ।
पाली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सावित्रीमाई फुले यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचा निस्सीम त्याग व योगदानाने महिलांचे स्थान उंचावले असल्याचे प्रतिपादन पाली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सायली मानकर यांनी केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सायली मानकर, आरोग्य सहाय्यिका स्वप्नजा देशमुख , औषध निर्माता सुरेश पाटिल, आरोग्य सहाय्यक कमलाकर मोकल, व आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.







