| नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील खांडपे येथील कर्जत पंच्यात समितीच्या केंद्र शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. खांडपे येथील केंद्रामधील खरवंडी येथील पेंडागॉन फॉर्म हाऊस येथे खांडपे केंद्रातील 13 शाळांतील शिक्षक आणि विद्यार्थीनीनी यांनी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी राजेंद्र आढाव, पुष्पा भुजंग दौंड यांच्या उपस्थितीत कुस्ती स्पर्धेत विभागस्तरावर प्रथम क्रमांक पटकाणार्या वैष्णवी गणेश गंगावणे या खेळाडूचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राजेंद्र आढाव, वेच्या गावित, नरेश हिंदोळे, काशिनाथ हिंदोळे, विद्या सगणे, योगिता मोरे, पुष्पा दौंड, सुहासिनी पवार, स्वाती पाटील, सरिता वाढवळ, चित्रा रजपूत, सिमा जोंधले, आरती परदेशी,भारती गावित, उपस्थित होते.