| पनवेल | वार्ताहर |
खारघर रेल्वे स्थानकातून एक 65-70 वर्षांची वृद्ध महिला लोकल पकडण्यासाठी चढत असताना तिचा तोल गेल्याने ती खाली पडत होती. यावेळी न्यूज 18 लोकमतचे सिनियर अँकर विलास बडे यांनी प्रसंगावधान दाखवून या महिलेचे प्राण वाचवले आहेत.
खारघर रेल्वे स्थानकातून ठाणे लोकल निघाली होती. त्यावेळी एक 65-70 वर्षीय महिला ही लोकल पकडण्यासाठी चढत असताना तिचा तोल गेल्याने ती प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधील फटीमध्ये अडकली. यावेळी विलास बडे यांनी क्षणाचाही विलंब न करता धावत जाऊन त्या वृद्ध महिलेचे प्राण वाचवले. विलास बडे यांनी दाखवलेल्या या तत्परतेचे कौतुक होत आहे.