| पेझारी | वार्ताहर |
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील म्हसोबा मंदिर पेझारी येथे मंगळवारी (दि.11) महापूजा आयोजित केली आहे. या पूजेला हजारो भाविक दर्शन घेण्यास व महाप्रसादचा लाभ घेण्यास येतात. यावर्षी या महापूजेसाठी महाप्रसाद नृपाल जयंत पाटील यांनी दिला आहे. पूजेनिमित्त सायंकाळी 5 वा. परशुराम गोपाळ पाटील यांचे जल्लोष म्हसोबाचा भजन आयोजित केले आहे. त्यासाठी मृदंग वादक प्रताप पाटील यांचे पट्टेशिष्य भास्कर बुवा म्हसणे नेरळ हे येणार आहेत. रात्री 9.30 वा. जल्लोष म्हसोबाचा मुकेश उपाध्ये प्रस्तुत आर्केस्ट्रा आयोजित केला आहे. त्यानिमित्त सोनाली भोईर, परमेश माळी, योगेश आग्रावकर या कलाकारांचे कार्यक्रम आयोजित केलेत. तरी सदर महापूजेचा व महाप्रसादाचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन म्हसोबा मंदिर ढोल पाडा यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे.