| पनवेल दि.21 | वार्ताहर |
मोटरसायकलची अज्ञात वाहनाला पाठीमागून जोराची धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना पनवेलमध्ये घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋतिक सुरेंद्रन (22) हा त्याची दुचाकवरून मित्र रावल सिंग याच्या सोबत जात होता. यावेळी शिवशंभू नाका ते ठाणा नाकादरम्यान भरधाव वेगाने जात असताना अज्ञात वाहनाला त्यांनी पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात ऋतिक सुरेंद्रनचा जागीच मृत्यू झाला तर रावल सिंग हा जखमी झाला.