महाडमध्ये बंडखोरांना शुभेच्छा देणारा बॅनर फाडला

| महाड | प्रतिनिधी |
एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना शुभेच्छा देणारा महाड शहरात लावलेला बॅनर फाडल्याचे आज आढळून आले.
महामार्गावरील बुटाला हॉल येथून महाड शहरात येणार्‍या रस्त्यावर हा बॅनर लावण्यात आला होता. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सर्व समर्थक आमदारांना या बॅनरद्वारे शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. बॅनरवर शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे, आ.भरतशेठ गोगावले, आ. महेंद्र दळवी, आ. महेंद्र थोरवे आणि युवा सेनेचे द. रायगड जिल्हा अधिकारी विकास गोगावले यांची छायाचित्रे होती. बॅनर कोणत्या संघटनेने, व्यक्तीने लावला याचा कोणताही उल्लेख या बॅनरवर नव्हता. आज सकाळी या बॅनरवरील आ.गोगावले आणि आ. दळवी , आ. थोरवे यांची छायाचित्रे फाडण्यात आल्याचे आढळून आले.

Exit mobile version