। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल येथील देवीचा पडा येथील पंकज चव्हाण यांनी नोव्हेंबर महिन्यात गावाकडील झालेल्या वादावरून दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. पंकज 14 जानेवारी रोजी पाले खुर्द येथील पाण्याच्या टाकीजवळ उभा होता. त्यावेळी सलाम शेख याने त्याची कॉलर पकडली. त्यानंतर अविनाश फडके व त्याच्यासोबत एक अनोळखी व्यक्ती कार मधून खाली उतरली. यावेळी, फडके याने आमच्यावर केस करतो का, असे बोलून आम्ही राजकुमार भाईची माणसे आहोत, तुला ठार मारेल, असे बोलून सलाम शेख याने त्याच्या चापट मारली आणि फडके व अनोळखी व्यक्तीने पंकजला हाता बुक्याने मारहाण केली. त्यानंतर पंकज चव्हाण पुढे गेला असता आकाश खंडागळे हा तेथे आला व त्याने देखील त्यांना मारहाण केली. त्यानंतर पुन्हा तिघे त्या ठिकाणी कारने आले आणि एका हत्याराने डोक्यावर वार करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी अविनाश फडके, सलाम शेख, आकाश खंडागळे आणि एका अनोळखी व्यक्ती विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.