। खरोशी । वार्ताहर ।
पेण एज्युकेशन सोसायटी संचलित प्रायव्हेट हायस्कूल व जुनिअर कॉलेजने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये तृतीय क्रमांक पटकावून त्यांची पनवेल येथील जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात निवड करण्यात आली होती. त्यात देखील त्यांनी तृतीय क्रमांक पटकावला असल्याने त्यांची अमरावती येथे होणार्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच, निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक, वक्तृत्व आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केल्यामुळे सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष अॅड. मंगेश नेने, कार्याध्यक्ष प्रशांत ओक, उपकार्याध्यक्ष संजय कडू, सेक्रेटरी सुधीर जोशी, तसेच प्राचार्या अंजली जोशी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.