। खरोशी । वार्ताहर ।
वावोशी येथील पेण एज्युकेशन सोसायटीच्या नाना टिळक प्राथमिक विद्यालयात पसायदान या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने वाडीया हॉस्पीटल मुंबई तर्फे शाळेतील लहान मुलांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी, वावोशी परिसरातील 212 मुलांनी याचा लाभ घेतला. या शिबिराचे उद्घाटन पसायदान संस्थेचे संस्थापक प्रशांत काणकोणकर व अध्यक्षा रूपाली काणकोणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, वाडीया हॉस्पीटलचे डॉ.अथर्व, डॉ.सागर, डॉ.अमित, सिस्टर श्रावणी, सिस्टर साधना, राहुल गावडे, समिता सावंत, अर्चना रामवंशी, रेश्मा जावीर, सतिश पवार, मनिष साळवी, प्रमोद परब, सुदेश माने, उपसरपंच दिपा शिर्के, रिया वालम, मयुर धारवे, माजी जि.प.सदस्य राम वाघमारे, केंद्रप्रमुख जयंत पाटील, गजानन हातनोलकर, संतोष शेवाळे, भगवान शेट्ये, तात्या चोरगे, पद्माकर यादव आदि मान्यवर उपस्थित होते.