जहाल भूपतीसह 60 नक्षलवाद्यांचे मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण
। गडचिरोली । वृत्तसंस्था ।
माओवादविरोधी लढाईत महाराष्ट्र पोलिसांना आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मिळाले आहे. गडचिरोली पोलीस आणि राज्याच्या गृह विभागाच्या संयुक्त कारवाईत माओवादी चळवळीतील अत्यंत महत्त्वाचा नेता मल्लोजूला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती याने आपल्या साठ सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केलं आहे. ही घटना (मंगळवारी दि.14) रात्री दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील छत्तीसगड सीमेलगतच्या घनदाट जंगलात घडली. पोलिसांच्या विश्वासार्ह सूत्रांनुसार, हे आत्मसमर्पण अत्यंत नियोजित आणि गोपनीय स्वरूपात पार पडले. वेणुगोपाल राव हा माओवादी संघटनेचा पॉलिट ब्युरो मेंबर आणि सेंट्रल कमिटी मेंबर असून, देशातील माओवादी चळवळीतील एक कळीचा मेंदू मानला जात होता. त्याच्या आत्मसमर्पणामुळे माओवाद्यांच्या संघटनात्मक रचनेला मोठा धक्का बसला असून, गडचिरोलीतील माओवादविरोधी कारवाईत हा ऐतिहासिक टप्पा ठरल्याचे सांगितले जात आहे. नक्षलवादी चळवळ देशात अखेरच्या घटका मोजत असतानाच महाराष्ट्रात या चळवळीला जोर का धक्का बसला. गडचिरोली जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर 61 माओवाद यांच्या आत्मा समर्पण झालेले आहेत. जहाल भूपती या नेत्यासह 60 हून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. हे सर्व नक्षलवादी समाजाच्या मुख्य प्रवाहात आले आहेत. त्यांनी शस्त्र खाली ठेवली आणि संविधान हाती घेतले आहे. विकासाचा मार्ग हा बंदुकीच्या धाकावर खुला होत नाही तर लोकशाहीतून वृद्धींगत होतो हे त्यांनी मान्य केले.







