भीषण! चालत्या डंपरने घेतला पेट

। उरण । वार्ताहर ।
गव्हाण फाटा येथील रस्त्यावर डंपरला अचानक आग लागण्याची दुर्देवी घटना शनिवारी (दि.27) सकाळी सातच्या सुमारास घडली. गव्हाण फाटा ते चिरनेर या परिसरात मोठ्या प्रमाणात डंपरमधून डेब्रिज, दगड, माती ने-आण करण्याची कामे सुरू आहेत.

शनिवारी गव्हाण फाटा येथील रस्त्यावरुन मार्गक्रमण करणार्‍या डंपरला अचानक आग लागण्याची घटना घडली. यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र काही काळ या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

Exit mobile version