| नागोठणे | प्रतिनिधी |
लायन्स क्लब इंटरनॅशनल या सेवाभावी संस्थेतर्फे संपूर्ण रायगड जिल्ह्यात सेवा सप्ताह उपक्रम नुकताच राबविण्यात आला. या सेवा सप्ताहात लायन्स क्लब ऑफ नागोठणे यांच्याकडून राबविलेल्या विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल लायन्स डिस्ट्रिक्टमध्ये क्लबला तृतीय क्रमांकाचा मानाचा पुरस्कार मिळाला. लायन्स क्लब नागोठणेच्या संपूर्ण परिवारासाठी ही अभिमानाची आणि आनंदाची बाब असून, त्यामुळे लायन्स क्लब ऑफ नागोठणेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याची प्रतिक्रिया नागोठणे लायन्स क्लबचे अध्यक्ष विलास चौलकर यांनी व्यक्त केली आहे.
लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या रायगड जिल्हा अंतर्गत सेवा सप्ताह उपक्रमांचा बक्षीस वितरण सोहळा वाशी (नवी मुंबई) येथे नुकताच पार पडला. यावेळी प्रमुख उपस्थित म्हणून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पीएमजेएफ प्रविण सरनाईक, पास्ट इंटर नॅशनल डायरेक्टर विजयकुमार राजु, पीआयडी पंकजकुमार मेहता, फर्स्ट व्ही.डि.जी. विनय गणात्रा, सेकंड व्ही.डि.जी. डॉ. नमिता मिश्रा, आयपीडीजी संजिव सुर्यवंशी, पीएमसीसी मार्गदर्शक ॲड. सुभाष भालेवाल, जीएसटी चेअरमन, पीएमजेएफ अनिल म्हात्रे तर नागोठणे लायन्स क्लबकडून पुरस्कार स्वीकारण्यासाठी अध्यक्ष विलास चौलकर, एमजेएफ यशवंत चित्रे, एमजेएफ विवेक सुभेदार, सेक्रेटरी डॉ. अनिल गीते, जॉईन्ट सेक्रेटरी विजय शहासने, जॉईन्ट ट्रेझरर विद्या म्हात्रे, सर्व लायन्स सदस्य अनुराधा शहासने, संतोष शहासने, सखाराम ताडकर, ॲड. महेंद्र धामणे आदी उपस्थित होते.
नागोठण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
