| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशनने 15 व्या पिंच्याक सिलॅट राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन दि. 15 ते 17 ऑगस्ट रोजी क्राईस्ट अकॅडमी स्कूल कोपरखैरणे, नवी मुंबई येथे केले होते. या स्पर्धेमध्ये 26 जिल्ह्यातील 485 खेळाडूंनी सहभाग नोंदविला. या स्पर्धा प्रि-टेन, सब ज्युनिअर, ज्युनिअर वयोगटातील मुला-मुलींसाठी होत्या.
या स्पर्धेमध्ये 46 सुवर्णपदक 20 रजतपदक 12 कांस्यपदक अशी सर्वाधिक पदके मिळवून नवी मुंबई संघ पहिल्या स्थानी तसेच 43 सुवर्ण 1 रजत पदके मिळवून सांगली जिल्ह्याचा संघ दुसऱ्या स्थानी व 13 सुवर्ण 13 रजत, 13 कांस्य पदके मिळवून तिसऱ्या स्थानी नाशिक जिल्ह्याचा संघ राहिला अनुक्रमे चौथ्या स्थानी 8 सुवर्ण 8 रजत 8 कांस्य पदके मिळवून अहिल्यानगर जिल्ह्याचा संघ राहिला या स्पर्धेतील विजयी खेळाडूंची निवड 26 ते 28 सप्टेंबर2025 रोजी हुबळी कर्नाटक येथे होणाऱ्या 13 व्या राष्ट्रीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. सर्व स्तरातून विजयी खेळाडूंचे अभिनंदन करण्यात येत आहे.
स्पर्धेचे उद्घाटन शिवाजीराव थोरवे, सुरेंद्र प्रताप सिंग, संजीव पांडे, हरिदास थोरवे, मिथुन जोशी, सुरेखा येवले, सुरेखा पाटील, मुकेश सोनवणे, प्रकाश पार्टे, पोर्णिमा तेली आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडला. तर बक्षीस वितरण समारंभ औदुंबर पाटील, किशोर येवले, संजय जाधव, तृप्ती बनसोडे, धनंजय जगताप, संकेत धामंडे, अरविंद शिर्के, विलास कांबळे, प्रवीण कुडले, सागर शेलार, योगेश पानपाटील, नागेश बनसोडे दत्ता भवारी, ओंकार मोहिते, आश्विनी राऊत, पल्लवी म्हात्रे व इतरांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य पिंच्याक सिलॅट स्पर्धेत पदकांची लयलूट
