। रोहा । प्रतिनिधी ।
श्री. विवेकानंद रिसर्च अॅन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोहा, एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड, आणि ज्ञान प्रबोधिनी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रज्ञा विकास कार्यक्रमांतर्गत उन्हाळी शिबीर प्रशिक्षण वर्ग (दि.10) शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते.
विवेकानंद रिसर्च अॅन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोहा चे प्रमुख व एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड (सीएसआर प्रमुख ) सुशिल रूळेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या या प्रशिक्षण वर्गामध्ये भौमितिक प्रतिकृती, जोडीकार्य – गटकार्य, गंमत खेळ, छोटे खेळ विविध स्पर्धा, योगा – सूर्यनमस्कार, भाषिक कोडी सोडविणे, कथा-कथन, मुलाखत तंत्र, पद्य प्रार्थना याचे विविध सत्रांचे मार्गदर्शन ज्ञान प्रबोधिनी शैक्षणिक उपक्रम संशोधिका, पुणे येथील ओंकार बाणाईत, स्वप्निल इंदापूरकर, अंकुश काळे, प्रथमेश पायगुडे यांनी केले.तर प्रसाद भोईर व व्ही आर टी आय संस्थेतील सदस्य यांनी याचे संयोजन केले.तालुक्यातील मुख्यतः ग्रामीण भागातील 15 शाळेमधील प्रत्येकी 2 शिक्षक व 2 वियार्थी असे एकूण 60 शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते. शाळांमध्ये घ्यावयाच्या शिबिरासाठी प्रत्येक शाळेला साहित्याच्या संचाचे वाटप करण्यात आले.
यामध्ये श्री. रा. ग. पोटफोडे (मास्तर):विद्यालय व कै. द. ग. तटकरे कनिष्ठ महाविद्यालय खांब, न्यू इंग्लिश स्कूल विठ्ठलवाडी – राजखलाटी, श्रमिक विद्यालय चिल्हे, कृष्णाजी संभाजी गोरीवले माध्यमिक विद्यालय तीसे पंचक्रोशी, माध्यमिक शाळा तळाघर, द. ग. तटकरे माध्यमिक विद्यालय विरजोली, द ग तटकरे माध्यमिक विद्यालय भालगाव, महात्मा गांधी विद्या मंदिर चोरडे, सर्वोदय विद्यालय सुड्कोली, न्यू इंग्लिश स्कूल शेणवई, सानेगुरुजी विद्यानिकेतन सानेगाव, सु. ए. सो. अष्टमी हायस्कूल, को. ए. सो. मेढे विभाग इंग्रजी शाळा मेढे, प.पु. पांडुरंग शास्त्री आठवले विद्यालय घाटाव आणि माध्यमिक विद्यालय, घोसाळे आदी शाळांनी महत्त्वपुर्ण सहभाग नोंदवून या कार्यक्रमाचा लाभ घेतला.तर प्रशिक्षण वर्गात प्रशिक्षण घेतलेले शाळेमधील शिक्षकांनी पुढील दोन दिवस त्यांच्या शाळेमध्ये उन्हाळी धमाल शिबराचे आयोजन करुन सुमारे यात सुमारे 1 हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.
ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यासाठीची गरज ओळखून उन्हाळी सुट्टीत अधिक नेमकेपणाने समृद्ध होण्यासाठी उपयोग होणार आहेफ. त्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यानी यात जास्तीत जास्त सहभागी व्हावे असे त्यांनी आवाहन केले. या प्रशिक्षण वर्गात याप्रसंगी सहभागी शाळांना जेष्ठ संशोधक डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचे आत्मचरित्र दुर्दम्य आशावादीफ हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले.