। पुणे । प्रतिनिधी ।
वडगाव शेरी भागातील एका सराफ व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्या चार जणांना चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, त्यांच्याकडून सोन्याच्या मुलामा दिलेल्या चार अंगठ्या जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी चांदीच्या अंगठ्यांना सोन्याचा मुलामा लावून त्या गहाण ठेवत होते.
सराफ व्यावसायिकाचे वडगाव शेरी भागात सराफी पेढी आहे. काही दिवसांपुर्वी रिक्षांमधून दोघे जण त्यांच्याकडे आले. त्यांनी सोन्याच्या अंगठ्या असल्याचे भासवून चार अंगठ्या गहाण ठेवून त्याबदल्यात एक लाख रुपये घेतले. या अंगठ्या बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली तांत्रिक तपास करुन आरोपी परदेशीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत परदेशीच्या साथीदारांची नावे निष्पन्न झाले. आरोपी शेख हा शिलवंत याच्याकडून या बनावट अंगठ्या घेत होता. परदेशी आणि सय्यद या अंगठ्या सराफ व्यावसायिकांकडे गहाण ठेवून फसवणूक करत होते.
ओमप्रकाश शामसुंदर परदेशी (58), फय्याज चांद सय्यद (35), आरिफ खलील शेख (41), शरण माणिकराव शिलवंत (46) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.