| पनवेल | वार्ताहर |
एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलास हाताने मारहाण केल्याप्रकरणी आरोपी विरोधात खांदेशर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील 17 वर्षीय मुलगा हा आसुडगाव से-5 येथे राहत असून उल्हास जावळे याने त्याला माझ्याकडे बघून का हसतो अशी विचारणा केली. यावेळी मुलाने मी हसत नसल्याचे सांगितले. यावर खोटं का बोलला असे बोलून उल्हास जावळे याने 17 वर्षीय मुलाच्या गालावर 5 ते 6 वेळा चापट मारल्या. याप्रकरणी जावळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.