। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ गावातील शार्विल सीबीएसई शाळेमधील स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना देशाची संस्कृती त्याचसोबत ऐक्याचे दर्शन घडवले. महाराष्ट्राची आणि देशाची परंपरा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे माध्यमातून सादर करतानाच महाराष्ट्राच्या मातीतील खेळ असलेल्या मल्लखांबाच्या प्रात्यक्षिकांनी सर्वजण अवाक झाले.
हुमेरा फाऊंडेशन संचालित शार्विल सीबीएसई शाळेचा वार्षिक गुणगौरव आणि स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रताप बँकेचे चेअरमन उमेश प्रताप सिंग, रुद्र इंटरनॅशनल बँकेचे चेअरमन अंबरीश दुबे, आयकर अधिकारी तारिक माबुद, कस्टम अधिकारी वसीम खान यांच्यासह राजिपचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, सावळाराम जाधव, आयुब तांबोळी, पोलीस उपनिरीक्षक नितीन मंडलिक आदी मान्यवर उपस्थित होते.