अलिबागच्या रुद्रा पिळणकरची सुवर्ण कामगिरी

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबागच्या रुद्रा विनय पिळणकरने लाठी स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली आहे. देशासाठी तिने दोन सुवर्ण व दोन रौप्य पदक मिळविले. तिच्या या कामगिरीबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

गोवा येथे 26 मे रोजी दुसरी दक्षिण एशियायी लाठी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत अलिबागसह रायगड जिल्ह्यातील अनेक मुले, मुली सहभागी झाले होते. अलिबागमधील पाच वर्षाच्या रुद्रा विनय पिळणकर हीने 2 सुवर्ण व 2 रौप्य पदक पटकावून अलिबागचे व देशाचे नाव उंचावले आहे. लाठी स्पर्धेतील एकम लाठी प्रकारात 1 सुवर्ण पदक , पंचम लाठी प्रकारात 1 सुवर्ण पदक असे दोन तसेच, अनिखम प्रकारात 1 रौप्य पदक आणि लाठी प्रकारत एक रौप्य पदक मिळवून नेत्रदिपक कामगीरी बजावली.

अलिबाग येथील के ई एस इंग्लिश मेडिअम स्कूलमधील रुद्रा विद्यार्थीनी आहे. रुद्राला या खेळासाठी प्रशिक्षक प्रियंका संदेश गुजांळ, शुभम महेंद्र नखाते, वेदांत सुर्वे, सिद्धार्थ अशोक पाटील यांचे मोलाचे प्रशिक्षण लाभले. तसेच पालकांकडूनदेखील चांगले प्रोत्साहन मिळाले. रुद्राच्या या कामगिरीबद्दल लाठी असोशिएशन अलिबाग रायगड संघटनेच्यावतीने तिचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Exit mobile version