हिंदूंच्या संख्येत मोठी घट

| मुंबई | वृत्तसंस्था |

हिंदू लोकसंख्या 1950 पासून सातत्याने घटत असल्याचे तर दुसर्‍या बाजूला अल्पसंख्यांकांची लोकसंख्या वाढत असल्याचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थापन केलेल्या समितीने दिला आहे. 1950 पासून हिंदूंच्या लोकसंख्येत सातत्याने घट होत असल्याचेही समितीने स्पष्ट केले आहे. पीएम मोदींनी स्थापन केलेल्या आर्थिक सल्लागार समितीने 2024 मध्ये हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. जगभरातील काही देशांच्या लोकसंख्येचा अभ्यास करुन, हा अहवाल सादर करण्यात आला आहे.

हिंदूंच्या लोकसंख्येत 7.8 टक्क्यांनी घट झाल्याचेही स्पष्ट केले आहे. तर दुसर्‍या बाजूला भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये त्या देशातील प्रमुख धर्मियांची लोकसंख्या वाढत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. शिवाय, यूपीएससीत मराठी यशवंतांचा टक्क घसरल्याचेही समोर आले आहे. अहवालानुसार, भारतात बौद्ध धर्मियांच्या संख्येत वाढ झाली आहे. दरम्यान, 1950 ते 2015 या काळात मुस्लिमांची लोकसंख्या 43.15 टक्क्यांनी वाढ झाली, तर ख्रिश्‍चनांच्या लोकसंख्येत 5.38 टक्क्यांनी वाढ झाल्याचा अहवाल आहे. शिवाय शीख धर्मियांच्या संख्येतही 6.58 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

1950 साली भारतातील हिंदूंच्या लोकसंख्येचा वाटा 84 टक्के होता. तो 2015 साली 78 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. तर मुस्लीमांचा 1950 मध्ये असलेला वाटा 9.84 टक्के होता, तो मात्र, 14.09 टक्क्यांवरती पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक सल्लागार समितीने जगभरातील 167 देशांत 1950 ते 2015 या कालावधीत लोकसंख्येत होत असलेल्या बदलांचा अभ्यास केला आहे.

Exit mobile version