सफाई कर्मचाऱ्यांसाठी एक हात मदतीचा

| माथेरान | प्रतिनिधी |

तिकीट चेकिंग वेल्फेअर ट्रस्ट मुंबईने 39 व्या वर्षात पदार्पण केल्याचे औचित्य साधून नववर्षाचे स्वागत ‌‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांद्वारे करण्यात आले. तिकीट चेकिंग वेल्फेअर ट्रस्ट, मुंबई रोटी डे ग्रुप कल्याण व स्वामी नारायण हॉल कल्याण यांच्या सहकार्याने व ट्रस्टच्या ॲक्टिव सभासद यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबविण्यात आला. दरम्यान, कल्याण साफसफाई कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक अन्नधान्याच्या पाकिटांचे मोफत वाटप शनिवार, दि. 3 रोजी सकाळी 11 वाजता कल्याण स्टेशन मॅनेजर ऑफिसमध्ये शशांक दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केले होते.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून नितीन भाई (रोटी डे ग्रुप, कल्याण), दिनेश ठक्कर (स्वामी नारायण हॉल, कल्याण), मधुबेन ठक्कर, श्री. पुजारा व ज्योति बेन पुजारा (समाजसेविका), रेल्वेचे अधिकारी हरजीराम मीणा (स्टेशन मॅनेजर कल्याण), राहुल गुजरे (कल्याण), राहुल मालवीया (कल्याण) व ट्रस्टचे अध्यक्ष डी.व्ही. चिंदरकर आदी मान्यवरांच्या हस्ते 65 सफाई कर्मचाऱ्यांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. ट्रस्टतर्फे सेक्रेटरी हरिश मोंडकर, खजिनदार गिरीश कदम, उपाध्यक्ष अभय कांबळे, ट्रस्टी आर.एम. बिरवटकर, प्रसाद करलकर, ॲक्टिव सभासद सुनील नैनानी, पी.डी. मोरे, युवराज डोहाळे उपस्थित होते.

Exit mobile version