आपत्तीतग्रस्थ गावांना एक हात मदतीचा

| पनवेल | वार्ताहर |

महाराष्ट्र शासन महसूल विभाग व वन विभाग यांच्या वतीने 1 ते 7 ऑगस्ट या दरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात महसूल सप्ताहअंतर्गत विविध उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरु आहे. गुरुवार दि.3 रोजी ‘एक हात मदतीचा’ या कार्यक्रमाअंतर्गत तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत झालेल्या गावांना भेटी देण्यात आल्या. मौजे पारगांव डुंगी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भरावाच्या कामामुळे मान्सून कालावधीत नांगरिकांच्या घरात पाणी जाऊन मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. त्याअनुषंगाने सिडकोमार्फत सदर नागरिकांना चार महिने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी देय रक्कम 50 हजार रुपये प्रमाणे प्रत्येकी एकुण 113 कुटुंबांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.

तसेच, मौजे कुंडेवहाळ येथे आदिवासी बांधवाना एकुण 35 जातीचे दाखले वाटप करण्यात आले. यासह आदिवासी बांधव व ग्रामस्थांसाठी आरोग्य तपासणी शिबीर लावण्यात आले असून त्यामध्ये 300 ग्रामस्थांनी शिबीराचा लाभ घेतला. त्याचबरोबर 10 वी व 12 वी परिक्षेत उर्तीण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यासह मौजे पोयंजे येथे जुलै 2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अंशत: पडझड झालेल्या कुंटुंबाना महसूल अधिकारी, महसूल कर्मचारी व काझी ट्रेडींग कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने एक महिना पुरेल अशा जिवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पनवेल तहसीलदार विजय पाटील यांच्यासह निवासी नायब तहसीलदार संभाजी शेलार, प्रभाकर नाईक, अजित पवार, तलाठी श्री. पठाण, रुपाली नाखवा यांच्यासह आदी उपस्थित होते.

Exit mobile version