| पनवेल | वार्ताहर |
महसूल सप्ताहनिमित्त ‘जनसंवाद’ या कार्यक्रमाअंतर्गत पनवेल तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच पनवेल महानगरपालिका कर्मचारी यांच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पनवेल तहसीलदार विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुक्यातील आजिवली येथील जनसंवाद कार्यक्रमांतर्गत नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी ग्रामस्थ तसेच विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करून ई-पीक पाहणी, ई-चावडी व पीकविमा याबाबतची माहिती देण्यात आली.
महाराष्ट्र शासन महसूल विभाग व वन विभाग यांच्या वतीने 1 ते 7 ऑगस्टदरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी (दि.4) पनवेल तालुक्यातील नेरे व घेरावाडी येथील जनसंवाद कार्यक्रमांतर्गत मंडळ अधिकारी, तलाठी यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून ई-पिक पाहणी, ई-चावडी व पिक विमा याबाबतची माहिती देण्यात आली. कोळखे येथील ग्रामस्थांमसवेत पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांनी चर्चा करून स्मशानभूमीबाबतचा प्रश्न मार्गी लावला व ई-पिक पाहणी, ई-चावडी व पिक विमा योजना, संजय गांधी निराधार योजना, नवीन मतदार नोंदणी याबाबतची माहिती दिली.