हिंदू धर्मीयाने सीपीआर देत वाचविले मुस्लिम युवकाचे प्राण
। नवी मुंबई । विशेष प्रतिनिधी ।
विविधतेत एकता असणार्या भारतात आजही फुटीरतावादाची बीजे मुळ धरुन आहेत. याला कारण असणार्या धर्मांध पुढार्यांच्या डोळ्यात अंजन टाकणारी घटना नवी मुंबई मधील खारघर परिसरात घडली आहे. एका हिंदू धर्मीयाने सीपीआर देत एका मुस्लिम युवकाचे प्राण वाचविले आहेत.
सचिन साळुंखे हे खारघर स्वप्नपूर्ती यथे राहत असून, ते तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरमध्ये बिलिंग विभागात कार्यरत आहेत. सकाळी मॉर्निग वॉक करीत असताना अचानक एक इसम कोलमडून खाली पडला. साळुंखे या व्यक्तीच्या मदतीला धावून आले. त्यांनी तात्काळ सीपीआर देऊन त्यांचे प्राण वाचविले.
पुढील तपासणीसाठी सायन हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आले. त्या व्यक्तीचे नाव होत जफर रसूल खान. जाफर हे वयाने तरुण असून ते एकमेव कुटुंबातील कमावते व्यक्ती आहेत.