मोरी खचल्यामुळे रस्त्याच्या मध्यभागी खड्डा

अपघातांची भीती, संबंधित खात्यांचे दुर्लक्ष
| पाताळगंगा | वार्ताहर |
निगडोली मार्गी चौक येथे जाणार्‍या रस्त्याची मोरी खचल्यामुळे मध्यभागी मोठा खड्डा पडल्यामुळे अपघातांची समस्या गंभीर बनत चालली आहे. या ठिकाणाहून पातळगंगा नदी वाहत असल्यामुळे तसेच या मार्गावरुन धारणी असरे, जांभिवली, चौक असे अनेक गावे जोडले असतांना असतांना गेले अनेक महिने हा खड्डा पडलेला असून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. हा रस्ता ग्रामीण भागातील गावांना जोडलेला असून या रस्त्याच्या दुरावस्थे बरोबर पडलेला खड्डा अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. रात्रीच्या वेळेस अनेक कामगार वर्ग या मार्गावरून प्रवास करीत असतांत. हा खड्डा संबंधित खात्यांने भरुन द्यावा अशी मागणी नागरिक व्यक्त करीत आहे.

Exit mobile version