डांबराच्या गोदामाला भीषण आग

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल ग्रामीण, प्रभाग क्रमांक 1 मधिल किरवली गाव येथील गोदामाला भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. आगीत गोदामात ठेवण्यात आलेले डांबराचे आणि रसायणांचे ड्रम जळून खाक झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच सिडको अग्निशमन दलाचे जवान घटना स्थळी पोहचले असून, आगीवार नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दुपारी अडीचच्या सुमारास घडलेल्या या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हाणी झालेली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक हाणी झाली आहे.

Exit mobile version