उरणच्या जेनिशाला गंभीर आजारानं ग्रासलं
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील बोकडविरा येथील प्रथमेश पाटील यांना आर्थिक मदतीची गरज आहे. त्यांच्या अडीच वर्षांच्या लेकीला SMA (spinal muscular atrophy type -3) या गंभीर आजाराने ग्रासले आहे. लेकीवर उपचार करण्यासाठी पाच कोटी रुपये खर्च येणार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र, घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने इतका पैसा आणणार कुठून असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. लेकीचे प्राण वाचावे यासाठी धडपडणाऱ्या आई-वडिलांना आर्थिक मदतीचा हात हवा आहे.
जेनिशा प्रथमेश पाटील (2 वर्षे, 4 महिने) हिला SMA (spinal muscular atrophy type -3) या गंभीर आजाराने ग्रासले आहे. सध्या तिच्यावर वाडीया चिल्ड्रेन हॉस्पिटल परळ तसेच नायर हॉस्पिटल मुंबई सेंट्रल या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हॉस्पिटलने जेनिशच्या गंभीर आजार असलेल्या एस.एम.ए या आजाराचे निदान करण्यासाठी 5 कोटी खर्च येणार असल्याचे सांगितले आहे. जेनिशा हिच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. घरची परिस्थिती नाजूक आहे. हलाखीची परिस्थिती असल्याने मुलीच्या गंभीर उपचाराचा सर्व खर्च तिचे आई-वडील करू शकत नाही. त्यामुळे त्यांनी विविध सामाजिक संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती यांनी जेनिशाला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे.
एसएमए-3 हा एक दुर्मिळ आजार आहे. याच्यावर वेळीच उपचार न केल्यास हा आजार मुलीचे सर्वच अवयव हळूहळू निकामी करू शकतो. हा आजार झालेली व्यकी कालांतराने आपली हालचाल बंद करतो. जेवणही कायमचे बंद करतो. अशा या गंभीर रोगाचे वेळीच इलाज करणे गरजेचे आहे, असे डॉ. शिल्पा कुलकर्णी नुरोलॉजिस्ट वाडिया हॉस्पिटल परळ मुंबई तसेच डॉ. अल्पना कोंडेकर नायर हॉस्पिटल मुंबई यांनी सांगितले आहे. सर्वांनी आपापल्या परीने खारीचा वाटा उचलत सढळ हाताने आर्थिक मदत केल्यास जेनिशाचे प्राण वाचू शकतात. एक चांगले पुण्य कर्म आपल्या हातून होऊ शकते. म्हणून ज्यांना ज्यांना आर्थिक मदत करायचे आहे, त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया अकाऊंट नंबर- 30509262966, IFSC कोड -SBIN0009832 या खात्यावर आर्थिक मदत पाठवू शकता.
