| उरण | वार्ताहर |
आवरे येथे 12 वी मध्ये शिकत असलेल्या सर्वेश गावंड याचा काही दिवसांपूर्वी एका कार दुर्घटनेत अपघात होवून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो नवी मुंबई येथील एका हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहे. सर्वेशची घरची परिस्थिती गरिबीची असल्याने हॉस्पिटल खर्चाच्या उद्भवलेल्या समस्येसाठी त्याचे कुटुंबीय आणि मित्र परिवारातर्फे सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत गोवठणे गावातील आकाश पाटील व त्याचे मित्र साहील गावंड, रितेश पाटील, निरज पाटील, शुभम वर्तक, सुबोध पाटील, मन म्हात्रे, वेदांत म्हात्रे, चरण वर्तक यांनी आपल्या गोवठने गावात घरोघरी फिरून स्वइच्छेने गोवठणे गावातील ग्रामस्थांकडून तब्बल 31,500/- रुपये इतकी आर्थिक मदत जमा करून मदत गोळा करून सर्व तरुण आणि सुनिल वर्तक यांनी सर्वेशच्या घरी जावून त्याच्या वडिलांच्या स्वाधीन केली. याव्यतिरिक्त गावातील बर्याच युवकांनी सर्वेशला वैयक्तिक मदत देखील केली आहे.