• Login
Thursday, February 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कार्यकर्त्यांनी कामाला लागा: जयंत पाटील

Antara Parange by Antara Parange
January 31, 2026
in sliderhome, राजकीय, रायगड
0 0
0
कार्यकर्त्यांनी कामाला लागा: जयंत पाटील
0
SHARES
84
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

थळ मतदारसंघात प्रत्यक्ष काम करणारा पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाने आपली ओळख निर्माण केली आहे. विकासाच्या नावाखाली फक्त पाट्या आणि नारळ फोडण्यापेक्षा शेकापने तळागाळातील जनतेसाठी न बोलता काम करून दाखवले आहे. या सर्व कामांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा शेकापचे तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी केला असून, सामान्य माणूस हाच विकासाचा केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी कृतीतून सिद्ध केले आहे. या निवडणुकीत सुरेश घरत यांची कन्या सानिका घरत मैदानात उतरली आहे. उच्चशिक्षित, अभ्यासू आणि तरुण चेहरा म्हणून सानिका घरत या थळ जिल्हा परिषद मतदारसंघाला नवी दिशा देऊ शकतात. त्यामुळे ही निवडणूक केवळ उमेदवाराची नसून, प्रामाणिक काम करणाऱ्या शेकापच्या विचारांची आहे, असे ठाम प्रतिपादन शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले. थळ जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार सानिका सुरेश घरत यांच्या प्रचारार्थ वरसोली तसेच थळमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, तालुका चिटणीस सुरेश घरत, थळ जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार सानिका सुरेश घरत, थळ पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार श्वेताली नरेंद्र थळकर आदींसह शेकाप, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यापुढे शेकाप सरचिटणीस जयंत पाटील म्हणाले की, सत्तेच्या जोरावर राजकारण करणाऱ्यांना थळमध्ये धडा शिकवण्याची हीच वेळ असून, सर्व कार्यकर्त्यांनी घराघरांत जाऊन शेकापचा झेंडा बुलंद करावा आणि सानिका घरत यांना बहुमताने विजयी करावे, असे आक्रमक आवाहन जयंत पाटील यांनी केले.

तसेच अलिबाग तालुक्याचा विकास हा शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून केला आहे. वरसोलीतील अनेक प्रश्न आपण पक्षाच्या माध्यमातून सोडविले आहेत. त्यामुळे आजही वरसोली येथील असंख्य नागरिक शेकापच्या पाठीशी कायम आहेत. वरसोलीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटीबध्द आहोत.

थळमधील आरसीएफ कंपनीमधील स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेकापने कायम प्रयत्न केले आहेत. या भागातील कोळी समाजाचा विकास साधण्यासाठी भविष्यात उपाययोजना करु. व्यापाऱ्यांची असलेली मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी आगामी काळात एक वेगळी भुमिका घेतली जाणार आहे. गावे, वाड्यांचा विकास अधिक वृध्दींगत कसा होईल याकडे पाहिले जाईल, असे जयंत पाटील म्हणाले.

गावांतील विकासासाठी कटीबध्द : सानिका घरत
थळ जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार आहे. मी तरुण पिढीची उमेदवार आहे. त्यामुळे तरुण पिढीच्या समस्या निश्चितच समजू शकते. हा जो आपला विभाग आहे, त्याठिकाणी मासेमारी करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. शासनाच्या उदासीनतेमुळे मासेमारी व्यवसाय मागे पडत आहे. हा व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्या दृष्टीने तयारी केली जाईल. रस्ते, पाणी आदी समस्या या भागात आहेत. त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. तरुण वर्गाला पुढे येण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यांना योग्य तो रोजगार मिळाला पाहिजे, जेणेकरून त्यांचे आणि त्यांच्या भविष्याचे प्रश्न सुटतील. या भूमिकेतून आगामी काळात काम करण्याचा एक मानस आहे.
जनशक्तीची लढाई जिंकू : सुरेश घरत
प्रचाराला चांगला पाठींबा मिळत आहे. सर्व श्रेय माझ्या गावाला जात आहे. वरसोली व अनेक गावांमध्ये आपण कामे केली आहेत. या मतदार संघात विरोधकांनी एक वेगळी दहशत निर्माण केली आहे. या दहशतीविरोधात ही लढत आहे. दहशत मोडीत काढण्यासाठी रणशिंगे फुंकले आहे. कोरोनाचा काळात आमदार कुठे होते? त्यावेळी शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील जनतेच्या हितासाठी धावून आल्या. आपल्यायला आमदारकीच्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे. सानिकाला निवडून देण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. सानिकाला निवडून आणून या मतदारसंघाचा विकास करायचा आहे. धनशक्तीविरुध्द जनशक्ती ही लढाई आहे. ती जिंकण्यासाठी सज्ज व्हावा, असे आवाहन तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी केले.
मक्तेदारी मोडीत काढा
आजची लढाई लढत असताना रस्ते, पाणीपुरता समस्या मर्यादीत राहिल्या नाहीत. येथील मच्छिमांरासह खेळांडूंचे प्रश्नही कायमच आहेत. रोजगाराचे प्रश्नही गंभीर आहे. आरसीएफसारखी कंपनी जवळ असताना बेकारीचे जीवन जगण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे. मग येथील आमदार आणि सदस्यांनी काय केले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सानिका घरत निवडून आल्यावर पहिले आंदोलन आरसीएफ कंपनीवर असणार आहे. येथील स्थानिकांसाठी ऑफलाईन परिक्षा झाली पाहिजे. त्यांना कंपनीत प्राधान्याने कायम घ्यावे, ही प्रमुख मागणी राहणार आहे. या मतदार संघात असलेली विरोधकांची मक्तेदारी दहशत मोडीत काढण्यासाठी ही लढाई असणार आहे. ही दहशत मोडीत काढण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी केले.

Related

Tags: adv. manasi mhatreindiajayant patilkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadnewsnews indiaonline marathi newspolitical newsraigadsanika gharatShwetali Thalkarskpskp newssocial media newssocial newssupriya patilsuresh gharat
Previous Post

खारघरमधील व्यक्ती बेपत्ता

Next Post

पनवेलमध्ये लोकशाहीचा ‌‘बाजार‌’?

Antara Parange

Antara Parange

Related Posts

बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसावर दगडफेक
क्राईम

प्रवासात सराफाचे सव्वा कोटींचे सोने चोरी

February 26, 2026
तोट्यातील एसटीला महिलांचा आधार
sliderhome

तोट्यातील एसटीला महिलांचा आधार

February 25, 2026
sliderhome

कर्मचाऱ्यांच्या लढ्याला शेकापचा पाठींबा

February 25, 2026
महावितरण कंपनीचा मनमानी कारभार
sliderhome

एक हजार 47 नवे विद्यूत सहाय्यक

February 25, 2026
sliderhome

मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या आशा दुर्लक्षित

February 25, 2026
sliderhome

अलिबागमध्ये सरकार जगाव आंदोलन

February 25, 2026
Next Post
पनवेलमध्ये लोकशाहीचा ‌‘बाजार‌’?

पनवेलमध्ये लोकशाहीचा ‌‘बाजार‌’?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?