निजामपुरात रंगली सुरेल मैफील

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव तालुक्यातील निजामपूर विभाग सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान व बाबुशेठ खानविलकर मित्रमंडळाच्यावतीने निजामपूर येथे जुनी बाजारपेठ याठिकाणी रविवारी पहाटे 6 ते सकाळी 9.45 दरम्यान दिवाळी पहाट कार्यक्रमाची सुरेल मैफिल रंगली. या कार्यक्रमात मंदार महामुणकर निर्मित सुनीला इव्हेंट्स प्रस्तुत ‌‘स्वरस्पर्श एक स्वरमयी’ या कार्यक्रमातील कलाकारांनी भक्तीगीत, भावगीत, कोळीगीत, लोकगीत, जुनी गाणी, कव्वाली, लावणी असे कलाविष्कार सादर केले.

या दिवाळी पहाट कार्यक्रमाचा आ. अनिकेत तटकरे यांच्यासह रसिक प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला. या दिवाळी पहाट कार्यक्रमात निजामपूर विभागातील सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, व्यावसाय आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवर व्यक्तींचा, विद्यार्थ्यांचा विशेष गुणगौरव व सन्मान सोहळा आ. अनिकेत तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात योगेश पवार, मंदार महामुणकर, गायिका श्वेता संजय दांडेकर, निवेदिका यामिनी महामुणकर, गायक प्रीतम बावडेकर, निवेदक आणि मिमीक्री आर्टिस्ट प्रतिम सुतार, गायक- निकेत इंगळे, गायिका अंकिता गोरुले, बासरी- राज धांगेकर, कीबोर्ड- मिलिंद बोर्डे, वादक – साईनाथ म्हात्रे, ऑक्टोपॅड- धीरज गोरेगावकर, तबला- धीरज नितीन बडे, साउंड- भावेश पवार, गायक- रवी महापरोळकर या सर्व कलाकारांना निजामपूरवासियांनी टाळ्यांच्या गजरात भरभरून दाद दिली.

Exit mobile version