हरमीत देसाईचा एकतर्फी विजय

| पॅरिस | वृत्तसंस्था |

भारताने टेबल टेनिसमध्ये चांगली सुरुवात केली आणि अनुभवी भारतीय खेळाडू हरमीत देसाईने एकतर्फी विजय नोंदवत दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. पॅरिस गेम्समध्ये ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणार्‍या हरमीतने जागतिक क्रमवारीत 538 व्या स्थानावर असलेल्या जॉर्डनच्या झायेद अबो यामनवर 4-0 असा शानदार विजय नोंदवला आणि आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात केली. 30 मिनिटे चाललेल्या या सामन्यात हरमीतने 11-7, 11-9, 11-5, 11-5 असा विजय मिळवला. यासह हरमीतने 64 ची फेरी गाठली आहे.

Exit mobile version