अतिवृष्टीमुळे घर कोसळून इसमाचा मृत्यू तर पत्नी जखमी

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील जांभूळपाडा, कातकरी वाडी, उरण येथे अतिवृष्टीमुळे घर कोसळून इसमाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

राम कातकरी असे यात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. या दुर्घटनेत त्यांच्या पत्नीला हातापायाला किरकोळ दुखापत झाली आहे.

तेथील कातकरी समाजाच्या आशा वर्कर सौ.नाईक यांनी त्या ठिकाणी स्वतः जावून माहिती घेतली. तहसिलदार आणि त्यांची टीम घटनास्थळी पोहोचले असून पुढची कार्यवाही सुरू आहे.

Exit mobile version