भारतात आढळला दुर्मिळ रक्त गटाचा व्यक्ती

। बडोदा । वृत्तसंस्था ।
साधारणपणे आपल्याला चार रक्तगट माहित असतात. यामध्ये ए, बी, ओ आणि एबी असे चार रक्तगट सर्वांनाच परिचयाचे आहेत. मात्र, भारतातील डॉक्टरांना एक दुर्मिळ रक्तगट आढळून आला आहे. हा रक्तगट असणारी व्यक्ती ही भारतातील पहिली आणि जगातील दहावी व्यक्ती असल्याची बाब समोर आली आहे. EMM² Negative असा हा दुर्मिळ रक्तगट आहे. गुजरातमध्ये ही दुर्मिळ रक्तगट असलेली व्यक्ती आढळली आहे. वय वर्ष 65 असलेल्या या व्यक्तीला हृदयविकाराचा आजार आहे.

मानवी शरीरात चार रक्तगट असतात. त्याशिवाय, शरीरात ए, बी, ओ, आएच आणि इएमएम सारखे 42 प्रकार असतात. त्याशिवाय 375 अ‍ॅण्टीजेन असतात. यामध्ये इएमएमचे प्रमाण अधिक असतात. एचच् अ‍ॅण्टीजेन नैसर्गिकपणे शरीरात विकसित होतात. मात्र, पुरेशा प्रमाणात एचच् नसल्याने त्यांना एचच् निगेटीव्ह असे म्हटले जाते. मात्र, जगातील फक्त 10 जणांच्या शरीरात इएमएमचे प्रमाण अधिक नसल्याचे समोर आले आहे. इएमएमचे प्रमाण कमी असल्याने हे इतरांपेक्षा वेगळ्या व्यक्ती आहेत. हा दुर्मिळ रक्तगट असल्याने या व्यक्ती इतरांना रक्तदान करू शकत नाही, अथवा त्यांना इतर रक्तगटांच्या व्यक्ती रक्त देऊ शकत नाही.

गुजरातमधील राजकोट येथे 65 वर्षीय व्यक्तीमध्ये हा दुर्मिळ रक्तगट आढळला आहे. समर्पण रक्तदान केंद्रातील डॉक्टर सन्मुख जोशी यांनी सांगितले की, या 65 वर्षीय व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना अहमदाबाद येथे हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले. या शस्त्रक्रियेसाठी त्यांना रक्ताची आवश्यकता होती. मात्र, अहमदाबाद येथील रक्तपेढीत त्यांच्या रक्तगटाचे उपलब्ध झाले नाही. त्यानंतर सुरत येथील रक्तपेढीत त्यांच्या रक्ताचे नमुने पाठवण्यात आले असल्याची माहिती डॉ. जोशी यांनी दिली.

रक्त गटाची अमेरिकेत तपासणी
या रक्तगटाची चाचणी केल्यानंतर हे रक्त कोणत्याही रक्तगटाशी जुळत नव्हते. त्यानंतर या व्यक्तींच्या नातेवाईकांनी रक्ताचे नमुने तपासणीसाठी अमेरिकेत पाठवले. त्यावेळी त्यांचा रक्त गट दुर्मिळ असल्याची बाब समोर आली. भारतातील हा पहिलाच रक्तगट असून जगातील दहावी व्यक्ती असल्याचेही समोर आले.

Exit mobile version