। नागपूर । प्रतिनिधी ।
सडक अर्जुनी तालुक्यातील खडकी बाह्यणी येथे शुक्रवारी (दि. 14) रात्रीच्या सुमारास भीषण अपघात घडला. एका खासगी बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या चिमुकलीसह तिच्या वडिलांचाही मृत्यू झाला आहे.
सूरजलाल वासाके (32) व वेदिका सूरजलाल वासाके (4) असे या अपघातातील मृतकांची नाव आहेत. हा अपघात सडक अर्जुनी तालुक्यातील खडकी बाह्यणी येथे घडला. या ठिकाणी अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या निर्माणधीन रस्ता बांधकामामुळे एकेरी वाहतूक सुरू असून दुसऱ्या मार्गावर रस्ता खोदून असल्यामुळे हा अपघात घडला. शुक्रवारी रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास कोहमाराकडून देवरीला दुचाकीने वडील आणि मुलगी जात होती. त्याचवेळी देवरीच्या दिशेने वेगाने येणाऱ्या खासगी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत वडील सूरजलाल वासाके व चिमुकली वेदिका वासाके या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.