अलिबागमध्ये आढळली दुर्मिळ रस्टी स्पॉटेड कॅट

| अलिबाग | वार्ताहर |

वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग संस्थेचे सक्रिय सदस्य अदिती सगर आणि समीर पालकर यांना कणकेश्वर मंदिर परिसरात रस्टी स्पॉटेड कॅट ह्या दुर्मिळ मार्जार कुळातील प्राण्याचे दर्शन झाले. ही रानमांजर प्रजाती अलिबाग तालुक्यात प्रथमच आढळून आली असून, ही आपल्या वन्य अधिवासाच्या गुणवत्तेची खूण आहे. ही रानमांजर ओल्या/दमट पानगळीच्या (moist deciduous forest) जंगलात राहते. ताडोबा, कच्छ तसेच पश्चिम घाट अशा ठिकाणी त्यांच्या नोंदी उपलब्ध आहेत.

कणकेश्वर तसेच अलिबागच्या सभोवताली असणाऱ्या टेकड्या आणि जंगलं यात अनेक प्रकारच्या दुर्मिळ पशु-पक्ष्यांचा निवास आहे, त्यामुळे यांचं संवर्धन करणे ही आपल्या सर्व अलिबागकरांची जबाबदारी आहे, असे वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबागचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रसाद दाभोळकर यांनी नमूद केले.

Exit mobile version