रायगडची जलकन्या रुद्राक्षी टेमकरचा विक्रम

धरमतर जेट्टी ते गेट वे ऑफ इंडिया अंतर केले पार

| उरण | प्रतिनिधी |

रायगडची 13 वर्षीय जलकन्या रुद्राक्षी टेमकर हिने ‘धरमतर जेट्टी’ ते ‘गेट वे ऑफ इंडिया’ हे 36 कि.मी. अंतर पोहून पार करत, आपल्या विक्रमांच्या यादीमध्ये आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. उरणमधील आर. के. एफ. जावाहरलाल नेहरू विद्यालयामध्ये शिकणाऱ्या 13 वर्षीय रुद्राक्षी मनोहर टेमकर या विद्यार्थिनीने आणखी एक विक्रम केला आहे. यापूर्वी तिने रेवस ते गेट वे ऑफ इंडिया 24 कि. मी., धरमतर ते मांडवा जेट्टी 26 कि. मी. आणि घारापुरी ते गेट वे ऑफ इंडिया 16 कि. मी. हे तीन जलमार्ग पोहून पार केल्याने तिला रायगडची जलकन्या म्हणून ओळखले जाते. या रायगडच्या जालकन्येने केलेल्या विक्रमांची नोंद आधीच ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’ ने घेतली आहे. तर तिने केलेल्या चौथ्या विक्रममुळे चर्चेत आली आहे. रुद्राक्षीने धरमतर जेट्टी येथून रात्रीच्या काळोखामध्ये समुद्राच्या पाण्यावर झेप घेत आपल्या विक्रमाला सुरुवात केली. रुद्राक्षीने ‘गेट वे ऑफ इंडिया’ला साक्ष ठेवत आपला विक्रम 8 तास 59 मिनिटांचा वेळ घेत पूर्ण केला. तिच्या या विक्रमची नोंद महाराष्ट्र राज्य हौशी जलातरण संघटनेने घेतली असून, संघटनेच्यावतीने आहेले निरीक्षक निलकंठ आखाडे यकानी रुद्राक्षीने विक्रम पूर्ण केल्याची अधिकृत घोषणा ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे केली.

रूद्राक्षीने केलेल्या विक्रमांबाबत बोलताना तिच्या कर्तृत्वाचे सर्व श्रेय तिने आपले आई, वडील आणि प्रशिक्षक हितेश भोईर यांना दिले आहे. तर मार्गदर्शक किशोर पाटील यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आभार देखील मानले आहेत. आपल्याकडे मेहनत करण्यासाठी ताकद, एकाग्रता, जिद्ध आणि परिस्थितीची जाणीव असेल तर आपण अनेक अडचणींवर मात करून आपले ध्येय प्राप्त नक्कीच करू शकतो असेही तिने बोलताना म्हटले आहे. तिच्या या विक्रमाला शहाबाज ग्रामपंचायत सरपंच कुमारी.डॉ.केतकी सतीश तरे यांनी हिरवा झेंडा दाखवला तर विक्रम पूर्ण झाल्यावर आर. के. एफ. व्यवस्थापनाचे उपाध्यक्ष रवींद्र इंदुलकर , विशाल माने , गिरीश पाटील (मुख्याध्यापक), जगदीश मडवी (पर्यवेक्षक) इंग्रजी माध्यम यांनी उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. विष्णू म्हात्रे, मधुकर बैकर, द्वारकानाथ पाटील, राजेंद्र टेमकर, संतोष टेमकर, कुलदीप टेमकर, नितीन टेमकर, संदीप टेमकर, सतीश पाटील, विठ्ठल टेमकर, नितीन पाटील, संतोष हरगुडे, दिनेश म्हात्रे, राष्ट्रीय जलतरणपटू आर्यन मोडखरकर, वेदांत पाटील, अद्वैत हरगुडे, मयंक म्हात्रे, आर्य पाटील उपस्थित होते.

Exit mobile version