एक धाव आरोग्यासाठी

| पेण | प्रतिनिधी |
रोटरी क्लब ऑफ पेण आरोयन आणि ओव्हरियन फाउंडेशन यांनी आयोजित एक धाव आरोग्यासाठी, एक धाव कॅन्सर मुक्तीसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन पेण महात्मा गांधी मंदीर येथे करण्यात आली होती. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये एकूण 363 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा दोन विभागात विभागण्यात आली होती. पुरुष गट आणि महिला गट एकूण सात किलोमीटरची स्पर्धा होती. महत्वाची बाब म्हणजे या स्पर्धेत पेण मधील आई डे केअरच्या गतीमंद व मतीमंद मुलांनी देखील सहभाग घेतला होता. ही स्पर्धा ओव्हरियन कॅन्सर या आजाराच्या जनजागृतीसाठी घेण्यात आली होती.

या स्पर्धेत पुरुष गटात लक्ष्मण दरोडा प्रथम क्रमांक (21 मिनीटे), हरीराम मोरया व्दितीय क्रमांक (22 मिनीटे) राज देवानंद पाटील तृतीय क्रमांक (24 मिनीटे) तर महिला गटामध्ये ऋुतुजा सकपाळ प्रथम क्रमांक (20 मिनीटे) दर्शना पाटील व्दितीय क्रमांक (23 मिनीटे) मनाली गुंजावळे तृतीय क्रमांक (26 मिनीटे) यांना सन्मान चिन्ह व रोख रक्कम देउन सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेची सुरुवात नगराध्यक्षा प्रितम पाटील, अण्णा वनगे, डॉ. सोनाली वनगे यांच्या हस्ते स्पर्धकांना झेंडा दाखवून करण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कृपा जोशी, डॉ. मनीष वनगे, डॉ. संदीप चौधरी, डॉ. सोनाली शेटये, पराग कणेकर, पर्णल कणेकर, संतोष पाटील, सुबोध जोशी, दर्शन म्हात्रे, अभिराज कणेकर यांच्यासह अनेक वैद्यकीय मंडळींनी मदत केली.कृषीवलशी बोलताना डॉ. वनगे यांनी सांगितले की, ही मॅरेथॉन स्पर्धा बीजकोषातील कर्करोग याबाबत जनसामान्यांना माहिती मिळावी या आजाराबाबत जनजागृती व्हावी म्हणून घेण्यात आली. हा आजार नेहमी उशीरा समजतो पहिल्यांदा या आजारामध्ये त्रास काहीच होत नाही. त्यामुळे त्याची नियमीत तपासणी करणे गरजेचे असते.

जेव्हा आपल्याला समजते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे या आजारात मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त असते. आणि ज्यावेळी हा आजारा समजतो त्यावेळेला त्या व्यक्तीचे वाचण्याचे प्रमाण खूप कमी असते. म्हणून स्त्रीयांनी नियमीत तपासणी करणे गरजेचे आहे. जेणेकरुन त्या आजाराचा निदान लवकरात लवकर होईल. आणि रुग्ण वाचण्याची शक्यता जास्त राहील म्हणून जनजागृतीचा उद्देश ठेवून आज या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते असे त्यांनी सांगितले.

Exit mobile version