दिल्ली कॅपिटल्सला धक्का

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

आयपीएलच्या प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी धडपडणार्‍या दिल्ली कॅपिटल्सला सोमवारी मोठा धक्का बसला आहे. दिल्लीला 8 सामन्यांत फक्त 3 विजय मिळवता आले आहेत आणि 6 गुणांसह हा संघ आठव्या क्रमांकावर आहे. प्ले ऑफसाठी त्यांना उर्वरित 6 सामन्यांत किमान पाच विजय मिळवावे लागणार आहेत. दरम्यान, दिल्ली संघातील स्टार खेळाडूने आयपीएलच्या उर्वरित सामन्यांतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. हॅमस्ट्रींग दुखापतीच्या उपचारासाठी दिल्लीचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श हा मायदेशात म्हणजेच ऑस्ट्रेलियात गेला होता. पण, आता त्याने भारतात न परतण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो उर्वरित आयपीएलला मुकणार आहे. आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी तंदुरुस्त होण्यासाठी मार्शने दुखापतीतून सावरण्यासाठी आयपीएलकडे पाठ फिरवण्याचा निर्णय घेतला आहे.

Exit mobile version