पनवेलमध्ये महायुती सरकारचा निषेध

। पनवेल । वार्ताहर ।

बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ पनवेल महाविकास आघाडीकडून येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मूक आंदोलन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी तोंडाला तसेच हाताला काळ्या पट्टया लावून महायुती सरकारचा जाहीर निषेध केला.

हे आंदोलन पनवेल-उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष व शिवसेना (ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. यावेळी माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, राष्ट्रवादी (शरद पवार) पनवेल जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या निर्मला म्हात्रे, शेकापचे गणेश कडू, माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे, मा. नगरसेविका सुरेखा मोहोकर, मा.नगरसेवक गोपाळ भगत, रविंद्र भगत, शिवसेना (ठाकरे) गटाचे उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, उपमहानगरप्रमुख रामदास पाटील, तालुकाप्रमुख विश्‍वास पेटकर, शिवसेना महिला आघाडी शहरसंघटक अर्चना कुळकर्णी, शहरप्रमुख प्रवीण जाधव, अरुण ठाकूर, निखील भगत, पराग मोहिते, डॉ.अमित दवे, काशिनाथ पाटील, शशिकांत बांदोडकर, हेमराज म्हात्रे, नंदराज मुंगाजी, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे, शेकाप कार्याध्यक्ष गौरव पोरवाल, मा.नगरसेवक शंकर म्हात्रे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी एक चिमुकली भाजप सरकारचा निषेध करणारे फलक घेऊन या आंदोलनात सहभागी झालेली पाहायला मिळाली.

Exit mobile version