| उरण | वार्ताहर |
कोकण मराठी साहित्य परिषद (मधूबन कट्टा) शाखा उरण येथे नुकतेच 100 वे साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. या संमेलनात कवी निवास थळे (रूक्मिणीकुमार) यांचा मनस्पर्शी काव्यसंग्रह सर्वोत्तम ठरला आहे. या संमेलनात अनेक राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात स्पर्धा घेण्यात आल्या. यांत अनेक राज्यस्तरीय नामांकित कवींनी भाग घेतला होता. उत्कृष्ट काव्यसंग्रह या विषयाच्या स्पर्धेत रा.जि .प शाळा पुगावचे मुख्याध्यापक व कवी निवास पांडुरंग थळे यांच्या मनस्पर्शी या कादंबरीला सर्वोत्कृष्ट प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. अध्यक्ष कवी एल.बी. पाटील, रोहा तालुका साहित्यिक सुखद राणे, कोमसाप शाखा रोहाच्या अध्यक्ष संध्या दिवकर, सचिव विजय दिवकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते हे पारितोषिक देण्यात आले.