| माणगाव | प्रतिनिधी |
पावसाळा म्हणजे रानभाज्यांची पर्वणी असते. काही भाज्या पावसाळ्यापूर्वी उगवतात तर काही भाज्या ह्या पावसाळ्यात उगवतात. शेवाळा, कुडा, आकुड इत्यादी रानभाज्या पावसाळ्यापूर्वी उगवतात या रानभाज्या खायला चवदार व पौष्टिक असतात.
गेल्या काही दिवसांपासून रानभाज्यांना बहर आला आहे. जिल्ह्यातील बाजारपेठेत रानभाज्या मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असून, रानभाज्यांना मोठी मागणी आहे. पावसाळ्यापूर्वी रानात कुडा, शेवल, आकुड इत्यादी रानभाज्या मोठ्या प्रमाणात उगवतात. या रानभाज्या खायला चविष्ट व पौष्टीक असतात. पावसापूर्वी ऋतूत येणाऱ्या या भाज्या खवय्यांच्या पसंतीच्या असून, या ऋतूत या भाज्यांना चांगली मागणी आहे.
रानभाज्या उगवल्या असून पावसाळा वाढत जाईल तशा अनेक भाज्या तयार होणार आहेत. आदिवासी स्त्रिया रानावणात फिरून सदर भाज्या मिळवतात. या भाज्या विकून त्यांना रोजगार मिळत असून, आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध होत आहे. 80 ते 100 रुपयांना तीन जुड्या मिळत आहेत. आवक वाढेल तशी दहा रुपये प्रति जुडी मिळेल. पावसाळ्यात मिळणाऱ्या या भाज्या खरेदी करण्यासाठी प्रवासी व नागरिक आवर्जून थांबून सदर भाज्या खरेदी करत आहेत.