| चणेरा | प्रतिनिधी |
गेले चार दिवस सतत मुसळधार पडत असलेल्या पावसामुले रोहा-कोलाड मार्गावरील सुदर्शन कॉलनी परिसरात रविवारी (दि.5) सायंकाळच्या सुमारास भलेमोठे वडाचे झाड स्त्यावर कोसळले. त्यामुळे रोहा-कोलाड मुख्य रहदारीच्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. काही श्रमदात्यांनी केवळ दुचाकीस्वार अत्यंत सावधगिरीने मार्ग काढत ये-जा करू शकतील अशा झाडाच्या फांद्या बाजूला केल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी घडली नाही. त्यानंतर या मार्गावर कोसळले झाड अत्याधुनिक यंत्राच्या साह्याने काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.
रोहा-कोलाड मार्गावर झाड कोसळल
