ट्रक चालकाला मारहाण केल्या प्रकरणी त्रिकुटाला अटक

। पनवेल। प्रतिनिधी।

भांडणाचा राग मनात धरुन ट्रक चालकाला मारहाण केल्या प्रकरणी त्रिकुटाला पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पनवेल जवळील बिंदु धाब्याच्या बाजुला पार्कीग जागेत, पुष्पकनगर जवळ तक्रारदार अशोककुमार अंग्रेजसिंग (45) हा असताना आरोपी मुनिष कुमार रामलुभाया शर्मा, (45), जसपाल दारासिंग, (32), रा. पंजाब व राजकुमार रोशनलाल, (44), रा. हिमाचल प्रदेश यांनी आपसात संगणमत करून मनिषकुमार याचे बरोबर झालेल्या भाडणांचा राग मनात धरून मारहाण करून व शिवीगाळी करून मुनिष कुमार रामलुभाया शर्मा, याने त्याचे हातातील लोखंडी तलवारीने त्याच्या उजव्या मांडीवर वार करून जखमी केले होते. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हजरत पठाण व पो.ना.प्रवीण मेथे व पथकाने या त्रिकुटाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हजरत पठाण करीत आहेत.

Exit mobile version