| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग शहरातील एका ज्वेलर्सच्या दुकानातून चोरी करणाऱ्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. सोन्याची चेन खरेदी करण्याच्या बहाण्याने ही चोरी केली असल्याची माहिती पोलीसांनी दिली.
वाघमारे नामक महिला रविवार 3 सप्टेंबर रोजी ज्वेलर्सच्या दुकानात शिरली. चेन खरेदीचा बहाणा करीत दुकानात कित्येक वेळ थांबली. दुकानातील मंडळींचे तिच्याकडे लक्ष नसल्याचा फायदा घेत तिने चलाखीने 95 हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन गायब केली. याप्रकरणी पोलीसांनी महिलेला ताब्यात घेतले असून ती मुळची पुणे जिल्ह्यातील कात्रज येथील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे.