| अलिबाग | प्रतिनिधी |
क्राईम ॲन्ड क्रिमीनल ट्रॅकींग नेटवर्क सिस्टीम म्हणजे सीसीटीएनएस प्रणाली द्वारे गुन्हे प्रकटीकरण, प्रतिबंधक कारवाई, अशा वेगवेगळी कामे करण्यात रायगड जिल्हा पोलीस दलाने महत्वपुर्ण कामगिरी बजावल्याने पुन्हा रायगड पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. वार्षिक गुणांकनामध्ये राज्यातून तिसरे स्थान प्राप्त केले असून हे सातत्य यंदाही कायम ठेवले आहे.
पुणे येथील रामटेकडीमधील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दोन येथे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या महाराष्ट्र कर्तव्य मेळावा 9 सप्टेंबरला पार पडला. यावेळी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक बहाल करण्यात आले.
सीसीटीएनएस प्रणालीचा जास्तीत जास्त वापर, गुन्हे प्रकटीकरण व गुन्हे प्रतिबंधक करण्यासाठी मासिक कामगिरीचा आढावा घेण्यात आला. यामध्ये रायगड पोलीसांची कामगिरी महत्वपुर्ण ठरल्याने रायगड पोलीसांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. 2022 प्रमाणे 2023 मध्येही रायगड पोलीसांनी सातत्य राखत वार्षिक गुणांकनामध्ये राज्यात तिसरे स्थान मिळविल्याने पोलीसांचे कौतूक करण्यात येत आहे.