। पुणे । वृत्तसंस्था।
पुण्यात पेट्रोल पंपावर रांगेवरून वाद झाल्यानंतर दोन तरूणांनी एका तरूणाला जबर मारहाण केल्याचा प्रकार पुणे शहरात घडला आहे. धमकी देत त्या दोघांनी तरूणाला बेदम मारहाण केली. हडपसर भागात पेट्रोल पंपावर घडलेला हा प्रकार तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
पुणे शहरातील हडपसर भागात असणाऱ्या पंपावर ही घटना घडली आहे. बुधवारी (दि.14) दुपारी पुण्यातील हडपसर भागातील एका पेट्रोल पंपावर एक तरुण त्याच्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी रांगेत उभा होता. मात्र त्याच वेळी दोन तरूण त्यांची बाईक घेऊन तेथे आले आणि त्यांनी त्या तरूणाच्या मागेत रांगेत उभे न राहत सरळ पुढे घुसल, “आधी मला पेट्रोल भरू दे” अशी दादागिरी केली. त्यावर त्या तरूणाने आक्षेप दर्शवला आणि त्यांना पुढे घुसू देण्यास नकार दिलयास दोन तरूण संतापले आणि त्यांवी कॉलर पकडली आणि त्याला बेदम मारहाण केली. यामध्ये नितेश गुप्ता हा तरूण जखमी झाला आहे. मारहाण करून ते तरूण तेथून निघून गेले. याप्रकरणी नागरिकांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे. पोलीस यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.