| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अज्ञात वाहनाने कट मारल्याने झाला अपघात
अलिबाग तालुक्यांतील भाल नाका येथे शुक्रवारी (दि.१७) रात्री मोटारसायकल व कारच्या अपघातात शुभम संदीप म्हात्रे या तरुणाचा मृत्यू झाला.
अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीवरील तरुणाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात तरुण जागीच ठार झाल्याची घटना भाल नाका येथे घडली आहे. शुभम संदीप म्हात्रे असे या तरुणाचे नाव आहे. तो अलिबाग भाल मार्गावरून आपल्या दुचाकीवरून जात होता. त्याचवेळी समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने कट मारल्याने त्याचे नियंत्रण सुटून अपघात झाला. यात तरुण गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
